Credit Card Limit : क्रेडिट कार्डची मर्यादा कमी का होते ?

Credit Card Limit : तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की काही बँका त्यांच्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डची मर्यादा (Credit Card Limit) कमी करतात. विशिष्ट परिस्थितीतच अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. याच पार्श्वभूमीवर बँका क्रेडिट कार्डची मर्यादा कमी करण्याचा निर्णय का घेतात? हे जाणून घेऊ या..

काही ग्राहक क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा अधिक वापर करतात. तुमचा क्रेडिट कार्ड युटिलायझेशन रेशो जास्त असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डची (Credit Card) मर्यादा कमी केली जाते. तुम्ही क्रेडिट कार्डचा मर्यादेपेक्षा जास्त वापर करत असाल तर तुमच्यावरील कर्ज वाढत जाणार, असे गृहित धरले जाते आणि क्रेडिट कार्ड देणारी कंपनी तुमच्या क्रेडिटची मर्यादा कमी करते.

Credit Card Limit

क्रेडिट कार्डचे बील देण्यासाठी विलंब केल्यास बँक तुमच्याकडे धोकादायक ग्राहक म्हणून बघते. क्रेडिट कार्डचे बिल देण्याएवढे तुमच्याकडे पैसे नाहीत, असे बँक गृहित धरते. अशा स्थितीत तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा कमी केली जाते.

काही लोकांकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स असतात. असे केल्याने संबंधित व्यक्तीची क्रेडिट कार्डची मर्यादा पटकन वाढते. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड (Credit Card Limit) वापरल्यास संबंधित व्यक्तीला वापरण्यासाठी जास्त पैसे उपलब्ध होतात. अशा स्थितीत तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात, असे गृहित धरले जाते. त्यामुळे तुमच्या क्रेडिटची मर्यादा कमी केली जाते.

क्रेडिट कार्डचा फारच कमी वापर केल्यावरही तुमच्या कार्डची मर्यादा कमी केली जाते. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरले तरच बँकांचा फायदा होतो. पण तुम्ही ते वापरतच नसाल तर त्याचा बँकेला काहीही फायदा नाही. याच कारणामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा फारच कमी वापर करत असाल तर तुमची लिमिट कमी केली जाते.

Leave a Comment