PMAY 2024 : प्रधानमंत्री आवास योजनेचा गेल्या काही वर्षात अनेकांना मोठा फायदा झाला आहे. यामुळे अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जून रोजी पहिल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना बाबत मोठी घोषणा केली. या योजनेअंतर्गत आता आणखी 3 कोटी घरे बांधण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास विकास योजना ही सरकारी योजना मोदी सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. या सरकारी योजनेंतर्गत समाजातील दुर्बल घटनाकांना आणि सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत घरे दिली जातात. देशात सध्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन प्रकारची पंतप्रधान आवास योजना सुरू आहे.
PMAY 2024
तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असेल
- ओळखीचा पुरावा – पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदार कार्ड.
- अर्जदार अल्पसंख्याक समुदायाचा असल्यास, त्याचा पुरावा सादर करावा लागेल.
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागाचे प्रमाणपत्र किंवा कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
- पगार स्लिप.
- आयटी परतावा तपशील.
- मालमत्ता मूल्यांकन प्रमाणपत्र.
- बँक तपशील आणि खाते तपशील.
- अर्जदाराकडे कायमस्वरूपी घर नसल्याचा पुरावा.
- अर्जदार योजनेअंतर्गत घर बांधत असल्याचा पुरावा.
PMAY योजनेसाठी अर्ज कसा करावा
प्रधानमंत्री आवास योजना अर्ज २०२४ ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्हाला भरता येईल. यासाठी तुम्हाला PMAY च्या अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in वर जाऊन PM Awas Yojna साठी अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://pmaymis.gov.in/.
- PM आवास योजनेवर क्लिक करा.
- नागरिक मूल्यांकन पर्याय निवडा आणि नंतर झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी किंवा इतर 3 पर्यायांखालील लाभावर टॅप करा.
- आता आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा आणि चेक वर क्लिक करा.
- तुमच्या समोर दुसरे पेज उघडेल, जिथे तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
- तुम्हाला नाव, फोन नंबर, इतर वैयक्तिक तपशील, बँक खाते तपशीलांसह माहिती फॉर्म भरावा लागेल.
- सर्व तपशील भरल्यानंतर, कॅप्चा प्रविष्ट करा. यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा. यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.