Solar Agriculture Pump : एकीकडे शासन अपारंपरिक ऊर्जेतील सौरऊर्जेला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे सौर कृषिपंपांच्या (Solar Water Pump) शेतकऱ्यांच्या हिश्शातील रकमेत मागील वर्षीपेक्षा सहा ते बारा हजार रुपये वाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना’ (PM KUSUM Scheme) गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
इलेक्ट्रिक मोटार पंपची सुविधा नसणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासाठी (SAUR KRUSHI PUMP) निवड झाल्याचे संदेश गेल्या आठ दिवसांपासून धडकले आहेत. नोंदणीवेळी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ३ एचपीसाठी हिश्शाची रक्कम १७ हजार ३० रुपये होती, परंतु आज ती २२ हजार ९७१ रुपये झाली आहे. त्यात ५ हजार ९४१ रुपये वाढ केली आहे. पाच एचपीची किंमत आता ३२ हजार ७५ तर ७.५ एचपीची किंमत ३२ हजार ९०० रुपये होती ती आता ४४ हजार ९२८ रुपये झाली आहे. जवळपास सहा ते सोळा हजार रुपयांनी सौर कृषी पंपाच्या किमती वाढल्या आहेत.
Solar Agriculture Pump
विशेष म्हणजे ‘लो’पासून ‘टॉप’ कंपनीच्या पंपांच्या किमतीही सारख्याच असल्याने शासन नेमके कोणाचे हीत जपत आहे, असा प्रश्न आहे. टॉपच्या कंपन्यांचा कोटादेखील संपला आहे. शेतकऱ्यांना हव्या त्या कंपनीचे सौर पंप (Solar Agriculture Pump) मिळत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
उपलब्ध कोटा असलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी लागत आहे. निवड करावयाचे पंप, पंपाची साइज, सौर यंत्र किती वॉटचे, किती स्टेजचा पंप घ्यावा, त्याचे हेडची साइज, दिवस भरातील पाणी उपसण्याची क्षमता किती आदींची माहिती शेतकऱ्यांना दिली जात नाही.
2 thoughts on “Solar Agriculture Pump : सौर कृषिपंपांच्या किमतीत पुन्हा वाढ”