PM Kisan Yojana : पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार

PM Kisan Yojana : पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ६,००० रुपयांवरून ८,००० ते १२,००० रुपये प्रतिवर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. २०१९ मध्ये ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

PM Kisan Yojana

आतापर्यंत २.८१ लाख कोटी रुपये वितरित

  • योजनेंतर्गत झालेल्या प्रगतीची माहिती देताना मंत्री म्हणाले की, सरकारने आतापर्यंत ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १५ हप्त्यांमध्ये २.८१ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित केली आहे.
  • जमीन धारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा लाभ दिला जातो. पीएम-किसान ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनांपैकी एक आहे.
  • शेतकरी-केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय या योजनेचे लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची खात्री झाली आहे, असेही मुंडा म्हणाले.

1 thought on “PM Kisan Yojana : पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार”

Leave a Comment

Close Visit News