Drip irrigation : तुषार आणि ठिबकसाठी 90 टक्के अनुदान मिळतयं, तुम्ही अर्ज केला का ?

Drip irrigation : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (Drip Irrigation) योजनेत चालू वर्षासाठी तुषार संच व ठिबक संच अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी प्रणालीवर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन योजनांच्या माध्यमातून ९० टक्के अनुदान (subsidy) देखील मिळणार आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ५५ टक्के व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत ३५ टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळते. त्याचप्रमाणे, बहू भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ४५ टक्के व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत ४५ टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळते.

Drip irrigation

८० टक्के अनुदान मिळणार 
  1. यंदाच्या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र जास्तीत जास्त प्रमाणात ठिबक सिंचनाखाली आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.
  2. ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकयांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत (drip irrigation subsidy) ५५ टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत २५ टक्के असे एकूण ८० टक्के अनुदान मिळते.
  3. त्याचप्रमाणे, बहू भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेत ४५ टक्के व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत ३० टक्के असे एकूण ७५ टक्के अनुदान मिळते.
Horticulture Crops
Horticulture Crops

Leave a Comment