Weather Forecast : पुढील 15 दिवस राज्यात उष्णतेची लाट, दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नका

Weather Forecast : राज्यात अनेक शहरातील (Weather Update) तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. किमान तापमानात देखील वाढ झाली आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या तापमानातदेखील चांगलीच वाढ झाली आहे. त्यात पुढील 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह (Heat Wave) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल

गेल्या दोन दिवसात विदर्भामध्ये 42 अंश सेल्सिअस, 43 अंश सेल्सिअस पर्यंत गेले मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी 40अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी पण आपल्या चाळीसच्यावर आकडे जाताना दिसतात तर सर्वसाधारणपणे गेल्या काही एक दिवसापासून हिट वेव्हची सुरुवात झालेली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमानात वाढ होण्याची शक्यता

Weather Forecast

येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोकं कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी 12 ते दुपार 3 पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका, असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे.

Weather Forecast

‘वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील पुढील पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही पाच ते नऊ एप्रिल मध्य महाराष्ट्रात 8 एप्रिल मराठवाड्यात 6 ते 9 एप्रिल विदर्भात, 9 एप्रिल कोकण गोव्यात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे 7 एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि 7 एप्रिलला विदर्भात ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवाान खात्यानं व्यक्त केला आहे. पुण्यात पुढील सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील 9 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Cow Milk Subsidy
Cow Milk Subsidy

Leave a Comment