Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांनी मिळणार दिलासा.

Gold Price Today : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver) मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत आज चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तुम्ही जर आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) किंमतीत मोठी घसरण झालीय. चांदीच्या दरात 2000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली आहे. त्याचबरोबर कालच्या तुलनेत सोने 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, सध्या चांदी 88,500 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.

Gold Price Today

MCX मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 600 रुपयांची घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्यामुळं सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 71,388 रुपयांवर आला आहे. तर बुधावारी हाच दर 71,970 रुपये होता. दरात घसरण झाल्यामुळं ग्राहकांना सोने खरेदीची (Gold Price Today) मोठी संधी मिळाली आहे.

  1. दिल्ली – 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो
  2. चेन्नई – 24 कॅरेट सोने 72,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो
  3. मुंबई – 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
  4. पाटणा – 24 कॅरेट सोने 72,210 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
  5. पुणे – 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
  6. कोलकाता – 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
  7. नोएडा – 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
  8. लखनौ – 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलोग्रॅम
  9. जयपूर – 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदी स्वस्त

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्या चांदीच्या दरात घसरण होत आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हचा अहवाल सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत.

Gold Loan
Gold Loan

Leave a Comment