Rabi Crop MSP : रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर, गहू हरभऱ्याचे चांगले दिवस येणार.

Rabi Crop MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी केंद्र शासनकडून हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. गहू, हरभरा आणि मसूर या पिकांच्या हमीभावात वाढ झाली आहे. सर्वात जस्ता वाढ मसूरच्या हमीभावात करण्यात आली आहे. हे वाचा : अतिवृष्टी नुकसान भरपाई आता नवीन पद्धतीने जमा होणार. दरर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या प्रतिक्विंटल 105 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यावर्षी हरभऱ्याच्या 5,335 रुपये दर मिळणार आहे. मात्र, वाढलेला उत्पादन खर्च पाहत शेतकऱ्यांना किमान 6,000 रुपये दर मिळणे अपेक्षित होता. तर, गव्हाच्या हमीभावात 110 रुपयांनी वाढ तर मसूरच्या हमीभावात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. Rabi Crop MSP केंद्र शासन कडून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांना योग्य दर मिळावा म्हणून हमीभाव जाहीर केले जातात. हे हमीभाव ठरविण्यासाठी राज्य व केंद्र पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन हमीभाव ठरवत असते. यावर्षी समितीने दिलेल्या आहवालानुसार हमीभावाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी हरभरा पिकाला प्रतिक्विंटल 5,230 रुपये हमीभाव