Weather Alert : ऐन गणेशोत्सवाच्या काळात पाऊस मुंबई आणि पुण्याला झोडपण्याची शक्यता आहे. कारण भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईत आज दिवसभर मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहील. 9 सप्टेंबर रोजी, तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, सामान्यतः ढगाळ आकाश आणि मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
10 सप्टेंबर रोजी तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, या काळात ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक भागांनाही वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिथे वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. तर पुणे आणि सातारा सारख्या शहरांसह मैदानी भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
Weather Alert
विदर्भात काय परिस्थिती ?
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. याशिवाय, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागातील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.