Vermicompost : गांडूळ खत कसं तयार करायचंय ? या सोप्या स्टेप्स फॉलो करा ! BH

Vermicompost : रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा (vermicompost project) अधिकाधिक वापर केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत असून त्यावर भर देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नेमकं गांडूळ खत कसं तयार करायचं, हे सोप्या शब्दांत पाहूया…

शेतीत गांडूळ खत तयार करावयाचे टप्पे : जागा निवडणे : गांडुळखत निर्मितीसाठी योग्य जागा निवडणे. त्यासाठी सावली असणारी, पाण्याची सोय जवळ असणारी व गांडुळांना लागणारे खाद्य तेथेच उपलब्ध होऊ शकणारी जागा शक्यतो निवडावी.

Vermicompost

सुका, ओला कचरा निवडणे

  • सुका, कोरडा कचरा निवडून घेवून त्यातील असेंद्रिय पदार्थ उदा. काटे, काचा, कॅरीबॅग, लोखंडी भंगार, प्लास्टीकच्या वस्तू इ. बाजुला काढाव्यात. फक्त कचरा एका वर एक थर लावून त्यात मधोमध, जागोजागी शेणाचा थर द्यावा किंवा शेणाचा सडा टाकावा व पाणी मारुन ओला करुन ठेवावा.

शेणाचा थर देवून सहा टाकणे

  • खत निर्मितीच्या चारही प्रकारात सारख्याच पद्धतीचा वापर केला जातो. सुरुवातीला अर्धवट कुजलेल्या कचऱ्याचा एक मीटर रुंदीचा, ६ इंच जाडीचा थर लावावा. लांबी आपल्या सोईनुसार ठेवावी, शेणाची स्लरी किंवा पाणी त्यावर मारावे. पुन्हा त्यावर कचरा व नंतर शेणाचा थर अशा प्रकारे दोन ते अडीच फुटापर्यंत उंची घ्यावी व नंतर सर्व बेडवर सर्व बाजुंनी शेणाची स्लरी किंवा शेणाचे पाणी मारावे.

गांडुळ सोडणे

  • बेडवर सोडावयाची गांडुळे मोकळी करुन एकत्र सारख्या प्रमाणात तुटक तुटक सोडावेत. बेडवर गांडुळे सोडल्यानंतर काही क्षणात ते आत शिरतील व नाहीसे होतील. बेडवर मुंग्या, उधी असे दिसल्यास त्यावर हळद पावडर किंवा हळदीचे पाणी मारावे. बेडमध्ये हात घालून तापमान वाढले आहे का ते तपासावे. तापमान जास्त असल्यास त्यावर गार पाणी दोन ते तीन वेळेस मारावे.

2 thoughts on “Vermicompost : गांडूळ खत कसं तयार करायचंय ? या सोप्या स्टेप्स फॉलो करा ! BH”

Leave a Comment

Close Visit News