Update Aadhar Card : आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट करायचे आहे ?

Update Aadhar Card : तुम्हाला तुमचे आधारकार्ड अपडेट करायचे आहे, तुमच्या पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा नावात बदल करायचा आहे, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI ) आधारची नोंदणी आणि अपडेट ( Aadhar Update ) नियमात बदल करण्यासंदर्भात एक अध्यादेश जारी केला आहे. आधारची नोंदणी आणि अपडेट करण्यासाठी नवीन फॉर्म जारी केले आहेत. जर कोणाला नवीन आधारकार्ड काढायचे असेल किंवा अपडेट करायचे आहे. त्यांना आता नवा अर्ज भरावा लागणार आहे.

आधारकार्डाचा डेमोग्राफिक डाटा उदा. नाव, पत्ता आदी अपडेट करणे नव्या नियमांमुळे आता अगदी सोपे होणार आहे. नवीन नियम केंद्रीय ओळख डाटातील माहीती अपडेट करण्याचे दोन मार्ग सांगत आहेत. एक म्हणजे वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने किंवा दुसरे म्हणजे आधार नोंदणी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

Update Aadhar Card

ऑनलाईन अपडेट

जुन्या नियमात ऑनलाईन पद्धतीने आधारकार्डातील आपला पत्ता आणि अन्य माहीती अपडेट करण्याची सुविधा होती. इतर बाबींना अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रांवर स्वत: ला जावे लागत होते. परंतू नवीन नियमात आता खूप सारी माहीती ऑनलाईन देखील अपडेट करता येणार आहे. भविष्यात आपला मोबाईल क्रमांक देखील ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे.

नवीन फॉर्मची सुविधा

आधारकार्ड नोंदणी आणि माहीती अपडेट करण्याचा सध्याचा फॉर्म नव्या फॉर्ममध्ये बदलण्यात आला आहे. नवीन फॉर्म क्रमांक 1 चा उपयोग आधार नोंदणीसाठी 18 वर्षे ते अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आणि अनिवासी भारतीयांसाठी होणार आहे. एका वर्गवारीच्या व्यक्ती माहीती अपडेट करण्यासाठी एकाच प्रकारचा फॉर्मचा वापर करु शकते.

1 thought on “Update Aadhar Card : आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट करायचे आहे ?”

Leave a Comment

Close Visit News