Today Cotton Market : कापूस दर वाढणार, सध्याची दरपातळी काय ?

Today Cotton Market : सध्या कापसाला सरासरी 7 हजार 700 ते 8 हजार 400 रुपये दर मिळतोय. बाजारातील सरासरी कापूस आवक आता काहीशी कमी झाली. पण एप्रिल महिन्यातील सरासरी आवकेच्या तुलनेत जास्तच आहे.

हे वाचा : पेट्रोल-डिझेल आणखी महाग ?

सध्या दररोज आवक 80 हजार ते 90 हजार गाठींच्या दरम्यान आहे. ही आवक पुढील काळात आणखी कमी होईल. त्यावेळी दरात सुधारणा दिसू शकते.

Today Cotton Market

हे वाचा : पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे.
दरवाढीला आधार

आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दर वाढले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंही कापूस बाजार सुधारतोय. पुढील काळात कापूस दराला बांगलादेशच्या खरेदीचाही आधार मिळेल. बांगलादेश भारताकडून कापूस खरेदी वाढवेल, असा अंदाज उद्योगातील काही जाणकारांनी व्यक्त केला.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये डाॅलरऐवजी रुपयातील व्यवहार वाढेल, असंही सांगितलं जातं. तसचं सुतगिरण्यांकडेही सध्या कापसाचा स्टाॅक काहीसा कमी आहे. या सर्व कारणांमुळं कापूस दरात सुधारणा होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Leave a Comment