Tar Kumpan Yojana (अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र)
- अर्जदारांचा आधारकार्ड
- ७/१२ उतारा
- 8अ
- जातीचा दाखला
- समितीचा ठराव
- ग्रामपंचायतचा दाखला
- वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
- शेतमालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचा सहमतीपत्र
Tar Kumpan Yojana
तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा ?
- तार कुंपण योजना 2023 साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल.
- विहित नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागतील.
- त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल, निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देय असेल.
तार कुंपण योजना अटी व नियम
- तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमणात नसावं.
- अर्जदारांनी तारकुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसावं.
- सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेतीव्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर करावा लागेल.
- तार कुंपण योजनेचा लाभ मिळवायचा झाल्यास, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीबाबतचा ठराव ग्राम परिस्थिती विकास समिती / संयुक्त वन व्यवस्थापन समिती / वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 क्विंटल लोखंडी काटेरी तार व 30 खांब पुरविण्यात येतील. ज्यासाठी 90% अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल.
- तर उर्वरित 10% रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या हिस्यातून भरावी लागेल.
2 thoughts on “Tar Kumpan Yojana : तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा ?”