Summer Crops : उन्हाळी सोयाबीन, भुईमूग करणार मालामाल.

Summer Crops : मागील चार वर्षांपासून खरीप हंगामाच्या काळात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनला मोठा फटका बसत आहे. मागील चार वर्षात सोयाबीनच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आता खरिपात सोयाबीनची लागवड न करता उन्हाळी सोयाबीन घेण्याकडे कल वाढविला आहे. मागील दोन वर्षात उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात काही प्रमाणत वाढ होत आहे.

हे वाचा : या दिवशी पीकविमा जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात.

उन्हाळी सोयाबीनची (Soybean) लागवड केल्यानंतर हे उत्पादन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा मग मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेता येते. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या वेळेस पुन्हा सोयाबीन (Soybean) लागवड करताना घरच्याच बियाणांचा वापर करतात येतो, यासह जिल्ह्यात उन्हाळ्यात आता मूग व उडीद लागवडीचेही प्रमाण देखील वाढले आहे.

Summer Crops

भुईमूग, सोयाबीन करणार मालामाल

अनेक केळी उत्पादक शेतकरी केळी बरोबर उडीद व मूग हे मिश्र पिकं घेऊन, एका वर्षात तीन हंगाम घेत आहेत. राज्यात उन्हाळ्यात भुईमूग, करडई, तीळ, सूर्यफुल या तेलवर्गीय पिकांची लागवड वाढत आहे. या पिकांना चांगला भाव असल्याने शेतकरी या पिकांना प्राधान्य देत आहेत.

हे वाचा : कापसाचे भाव वाढणार कधी ? शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा..!

उन्हाळी पिकांची लागवड किती ? (हेक्टरमध्ये)
  • भुईमूग       : 3000 ते  4000
  • तीळ          : 400 ते 500
  • सोयाबीन   : 1500 ते 2000
  • मूग           : 500 ते 70000

Leave a Comment