Soybean MSP Procurement : नवे सोयाबीन बाजारात येण्याच्या ऐन तोंडावर सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. नव्या मालाची आवक वाढल्यानंतर बाजारभावावर आणखी दबाव येऊ शकतो. या काळात शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळावा यासाठी सरकार हमीभावाने सोयाबीन खरेदी करणार आहे. केंद्राय कृषी मंत्रालयाने महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना नाफेड आणि एनसीसीएफला केल्या आहेत.
यंदा सरकारने सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्येही सोयाबीन खरेदीसाठी तयारीच्या सूचना दिल्या आहेत. कृषी मंत्रालयानेे ट्विटरवरून ही माहीती दिली. विशेष म्हणजे कृषी मंत्रालयाने केवळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्याचा उल्लेख केला. सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे.
Soybean MSP Procurement
यंदा देशात आणि राज्यात सोयाबीनची पेरणी वाढली आहे. यामुळे सुरुवातीला उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात होती. पण मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात पाऊस झाला. सोयाबीन पिकाला याचा मोठा फटका बसला. नुकसान झाल्याने उत्पादनातही काही प्रमाणा घट येईल, असा अंदाज आतापासून व्यक्त केला जात आहे.