Soybean Market : जाणून घ्या आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

Soybean Market : आज सकाळच्या सत्रात राज्यातील केवळ २१ बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक आणि लिलाव पार पडला. यामध्ये केवळ एका बाजार समितीमध्ये हमीभावाएवढा दर मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर होता. मागच्या दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर खाली येत असून सध्या काही ठिकाणी हमीभावापेक्षा एका हजाराने कमी दर मिळताना दिसत आहेत.

दरम्यान, आज सकाळी लोकल आणि पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. त्यामध्ये गंगाखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार ६५० रूपये एवढा सरासरी दर मिळाला असून येथे केवळ २५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. त्याचबरोबर अंबड वडीगोद्री आणि सिंदी-सेलू या बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.

Soybean Market

आज सिंदी सेलू आणि कारंजा या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक झाली होती. इतर बाजार समित्यांमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा कमी सोयाबीनची आवक झाली आहे. सोयाबीनची आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत असून अनेक शेतकऱ्यांनी दर नसल्यामुळे आपला माल साठवून ठेवला आहे.

बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
छत्रपती संभाजीनगर21380042514026
कारंजा2500410044554350
तुळजापूर60446044604460
मालेगाव (वाशिम)450410043654200
सोलापूर18450045004500
नागपूर399410042004175
हिंगोली500410545504327
अंबड (वडी गोद्री)32370044513850
यवतमाळ309408043804230
मालेगाव8412543664360
चिखली810410044004250
चाळीसगाव40427743254289
हिंगोली- खानेगाव नाका142430043504325
गेवराई22434543504350
गंगाखेड25465047004650
औराद शहाजानी369447145054488
पाथरी14435044004396
पालम75450045004500
आष्टी- कारंजा257410044304250
सिंदी(सेलू)1000380044003850
सोनपेठ25447144714471

Leave a Comment

Close Visit News