Smart Aadhaar Card : बँक खाते उघडणे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणे असो, प्रत्येक कामात आधार कार्ड विचारला जातो. आजच्या युगात, आधार कार्डचा (Aadhar Card) वापर मुख्यतः पत्त्याचा पुरावा म्हणून केला जात आहे. याशिवाय मुलांच्या शालेय प्रवेशासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे.
पीव्हीसी आधार कार्ड बाळगतात. यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये खर्च करावे लागतील, ज्यामध्ये स्पीड पोस्टचा खर्च देखील समाविष्ट आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आता आधार कार्डचे पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVCAadhaar Card) कार्ड जारी करत आहे, हे चमकणारे PVC आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे, खाली तपशीलवार जाणून घ्या.
Smart Aadhaar Card
पीव्हीसी आधार कार्ड कसे ऑर्डर करावे
सर्वप्रथम, UIDAI ची अधिकृत वेबसाइट (https://uidai.gov.in) उघडा, त्यानंतर ‘माय आधार विभागात’ ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ वर क्लिक करा. तुम्ही ऑर्डर Aadhaar PVC कार्ड वर क्लिक करताच, तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाकावा लागेल, या तिन्हीपैकी कोणताही एक टाकावा लागेल.
1 thought on “Smart Aadhaar Card : आता फक्त पंन्नास रूपयांत मिळवा हे स्मार्ट आधार कार्ड..”