Scholarship : 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना पूर्ण शुल्क माफी

Scholarship : 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थीनींना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफी (mahadbt) देण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलींच्या शुल्कात माफी देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थाना या खर्चाची परतफेड करेल. जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रकात पाटील यांनी याची घोषणा केली. सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात ५० टक्के शुल्क माफी (scholarship portal) होती. आता ही शुक्लमाफी १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Scholarship

‘उच्च शिक्षणातील विविध कोर्सेससाठी मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश घ्यावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत. तसेच कुलगुरुंनी वेळेवर निकाल लागावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’ सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना फायदा होणार आहे. त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता आहे.

1 thought on “Scholarship : 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थीनींना पूर्ण शुल्क माफी”

Leave a Comment

Close Visit News