Ration Card New Rules

Ration Card New Rules (या कारणांमुळे रेशनकार्ड बंद होऊ शकतं)

रेशनकार्ड कोणत्याही नागरिकाचे बंद किंवा रद्द होणार नसून, ज्या व्यक्तीला गरज नसताना किंवा पात्रता नसताना मोफत रेशन धान्य, स्वस्त रेशन धान्य योजनेचा लाभ अशी व्यक्ती आवश्यकता नसताना मिळवत असेल, अशा निकषात न बसणाऱ्या सर्व रेशन कार्डधारक व्यक्तींचा रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. त्यासाठीचे महत्त्वपूर्ण निकष खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहेत.

  • अन्नपुरवठा विभागाच्या नवीन निकषानुसार एखाद्या व्यक्तीकडे चार चाकी गाडी (कार, ट्रॅक, ट्रॅक्टर इत्यादी) असेल, तर अशा व्यक्तीला सदन लक्ष्यात घेऊन रेशन धान्य देण्यात येणार नाही.
  • एखाद्या रेशन कार्डधारकांकडे स्वतःच्या कमाईतील 100 चौरस मीटरचा फ्लॅट विकत घेतलेला असेल, तर अशा व्यक्तींनासुद्धा अपात्र ठरविण्यात येईल.
  • वैयक्तिक नागरिकाची किंवा एकत्रित कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींची मिळकत म्हणजेच उत्पन्न वर्षाकाठी ग्रामीण भागात दोन लाख रुपये व शहरी भागासाठी तीन लाख रुपये पेक्षा जास्त असेल, तर अशा कुटुंब धारकांनासुद्धा अपात्र ठरविण्यात येईल.
  • जर एखाद्या व्यक्तीकडे मोठ्या प्रकारचा व्यवसाय, दुकान असेल, तर अशा व्यक्तीला सदन समजून अपात्र ठरविण्यात येईल.

Ration Card New Rules

रेशनधारकांची पडताळणी होणार
  • शासनाकडून जिल्हा व तालुका स्तरावर अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे काम लवकरच सुरू होणार असून यामध्ये अपात्र ठरणाऱ्या नागरिकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येऊ शकतं. त्यामुळे अशा रेशन कार्डधारकांनी स्वतः होऊन opt out of subsidy हा फॉर्म भरून संबंधित तहसील कार्यालयामध्ये द्यायचा आहे.

Leave a Comment