PM Suryoday Yojana : सोलर पॅनल योजनेद्वारे 18 हजार कोटी रुपयांची बचत

PM Suryoday Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांनी देशवासियांना दिलासा देत सौर पॅनेल (Solar Panel) बसवण्यासाठी PM सूर्योदय योजना (PM Suryoday Yojana) जाहीर केली होती. पंतप्रधान सूर्योदय योजना म्हणजेच सोलर पॅनल योजनेद्वारे जनतेची 18 हजार कोटी रुपयांची बचत होणार आहेत. त्यासोबत मोठ्या प्रमाणात नोकऱ्यादेखील उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पीएम सूर्योदय योजनेबाात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

सूर्योदय योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी घरांवर सोलर पॅनेल बसण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये पीएम सूर्योदय योजनेची घोषणा करताना सांगितलं की, छतावर सौर पॅनेल (Solar Panel) बसवून एका कुटुंबाला किमान 300 युनिट विजेची बचत करता येईल, ज्यामुळे सुमारे 18,000 कोटींची बचत होईल. देशातील कोट्यवधी कुटुंबे वीज वाचवू शकतील. यासोबतच ही कुटुंबे वीज कंपन्यांना अतिरिक्त वीज विकून अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकतात.

PM Suryoday Yojana

नव्या रोजगाराच्या संधी मिळतील

  • पीएम सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, अशी आशा अर्थमंत्री सीतारामण यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान सूर्योदय योजनेतून निर्माण होणारी ऊर्जा पुरवण्यासाठी कौशल्य असलेल्या तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे भविष्यात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील.
Gold Rate Today
Gold Rate Today

1 thought on “PM Suryoday Yojana : सोलर पॅनल योजनेद्वारे 18 हजार कोटी रुपयांची बचत”

Leave a Comment

Close Visit News