Matsya Sampada : पीएम मत्स्यसंपदा योजना लाभ घेतला का ?

Matsya Sampada : मत्स्यव्यवसाय क्षेत्र रोजगार, अन्न व पौष्टिक सुरक्षा, परकीय चलन, मिळकत आणि लाखोंच्या उत्पन्नासाठी विशेषतः ग्रामीण भागातील विकासातील महत्त्वपूर्ण कामांमुळे मत्स्यपालन विकास कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मच्छिमार, मत्स्यशेतकरी व या व्यवसायावर अवलंबुन असलेल्या व्यक्तीनां उदरनिर्वाहचे साधन उपलब्ध करुन देत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना (PMMSY) राबविण्यात येत आहे.

मासे हा किफायतशीर प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, उपासमार आणि पोषक तूट कमी करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. मासेमारी, मत्स्यपालक, मासे विक्रेते आणि मासेमारी व मत्स्यव्यवसाय संबंधित अनुषंगाने समावेश असलेल्या इतर भागधारकांना उत्पन्न वाढविण्याची आणि आर्थिक भरभराट होण्याची या क्षेत्रामध्ये अपार क्षमता आहे. भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या टिकाऊ व जबाबदार विकासाच्या माध्यमातून निलक्रांती घडवून आणण्यासाठी ही योजना राबवित आहे.

Matsya Sampada

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची उद्दिष्टे

 • शाश्वत, जबाबदार, सर्व समावेशक आणि योग्य पद्धतीने मत्स्यव्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवणे.
 • उपलब्ध जमीन व जलस्त्रोतांचे विस्तारीकरण, विविधीकरण आणि पुरक वापराद्वारे मत्स्योत्पादन व मत्स्यव्यवसायाची उत्पादकता वाढविणे.
 • मूल्य साखळीचे आधुनिकीकरण आणि मजबुतीकरण तसेच मासेमारी नंतरचे व्यवस्थापन आणि गुणवत्ता सुधारीकरण करणे.
 • मच्छिमार व मत्स्यकास्तकार यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि रोजगार निर्मिती वाढविणे.
 • निर्यात व कृषि उत्पादन मुल्यवर्धनामध्ये मत्स्यव्यवसायाचे योगदान वाढविणे.
 • मच्छिमार व मत्स्यसंवर्धकांची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा बळकटीकरण करणे.
 • मजबूत मत्स्यव्यवसाय व्यवस्थापन आणि नियामक रचना करणे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंचा लाभ कोण घेऊ शकतं

 • मच्छीमार / मत्स्यशेतकरी / बेरोजगार युवक / उद्योजक.
 • मासे उत्पादक. मत्स्य कामगार आणि मत्स्य विक्रेते.
 • मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ,
 • स्वंयमसहाय्यता गट (SHGS) / संयुक्त दाईत्व गट (JLGs).
 • मत्स्यव्यवसाय क्षेत्रात महिला स्वंयमसहाय्यता गट.

2 thoughts on “Matsya Sampada : पीएम मत्स्यसंपदा योजना लाभ घेतला का ?”

Leave a Comment

Close Visit News