PM Kisan Maharashtra (हे शेतकरी अपात्र)
- 3.92 लाख आयकर भरणारे शेतकरी त्यांच्या खात्यात 468.18 कोटी रुपये जमा.
- 9.41 लाख अन्य कारणांमुळे अपात्र ठरलेले शेतकरी त्यांच्या खात्यात जमा 1083 कोटी रुपये.
ई केवायसीमुळे घटली संख्या : केंद्र सरकारकडून सन्मान निधीचा 14 या हप्ता शेतकयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी सक्ती असल्याने शेतकयांची संख्या 80 लाखांपर्यंत खाली आली आहे.
PM Kisan Maharashtra
आतापर्यंतची वसुली
- कर भरणाऱ्यांकडून 77 लाख रुपये तर अन्य अपात्र शेतकन्यांकडून 15367 लाख रुपयांची वसुली आतापर्यंत करण्यात आली आहे.
खात्यात पैसेच नाहीत
- सरकारने यासाठी संबंधित अपात्र शेतकन्यांना पैसे परत करण्यासाठी नोटिसा पाठवल्या. पैसे जमा झालेल्या खात्यांतून पैसे वळते करण्याचे निर्देश बँकांनाही देण्यात आले. मात्र असे केले असता बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात शून्य शिल्लक असल्याचे दिसून आले.
7/12 वर करणार थकबाकीची नोंद
- नोटिसा पाठवूनही या शेतकऱ्यांकडून दाद दिली जात नसल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीच्या 7/12 वरच पैशांच्या थकबाकीची नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे बँकांकडून कर्ज घेताना तसेच जमिनीचे कोणतेही व्यवहार करताना या शेतकऱ्यांना पैसे जमा करूनच पुढचे व्यवहार करता येणार आहेत.