Pik Vima News : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 (PMFBY) मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई रकमेचे 31 मेपर्यंत वाटप करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली.
हे वाचा : कापसाचे भाव वाढणार कधी ? शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी (Insurance Company), एचडीएफसी अर्गो, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या पाच विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.
Pik Vima News
नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त झालेल्या सूचना, नुकसानभरपाई लाभार्थी संख्या याचा वेळोवेळी आढावा मंत्रालयीन स्तरावर या विमा कंपन्यांकडून घेण्यात येतो. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी हे विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींचा नियमित आढावा घेत असतात.
हे वाचा : आजपासून सर्व महिलांना ST मध्ये आता अर्धे तिकीट.
येत्या 15 दिवसांत या विमा कंपन्यांनी फेटाळलेल्या अर्जांची पुनर्तपासणी करून कार्यवाही करण्याचे कंपन्यांना निर्देश दिले जातील. शेतकऱ्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पाच विमा कंपन्यांकडे आतापर्यंत 9 लाख 51 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत, आतापर्यंत शेतकऱ्यांना 2 हजार 861 कोटी इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
Excellent blog post. I definitely appreciate this website. Continue the good work!