Organic Fertilizer Production

Organic Fertilizer Production (शेणखताला भाव काय ?)

  • राज्यात दोन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉलीप्रमाणे शेतणखताची विक्री सुरु आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे. सध्या शेणखताची ट्रॉली 1,500 ते 2,000 रुपये प्रमाणे विक्री होत आहे.

Organic Fertilizer Production

शेणखतासाठी वेटिंग
  • सध्या पशुधनाचे संगोपन करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंत्राद्वारेच शेतातील बहुतांश कामे करण्यावर भर आहे. परिणामी, यांत्रिकीकरणामुळे पशुधनाची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेणखतासाठी वेटिंग करावी लागत आहे.
शेणखत कसे तयार कराल?

जनावरांचे शेण, मूत्र, शेतातील पालापाचोळा, पिकांचे अवशेष, कुजण्यायोग्य सेंद्रिय पदार्थ जैविकरित्या कुजवून सेंद्रिय खत तयार करता येते. अलीकडे या खताला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून भावही चांगला मिळत आहे. यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरीही शेणखताची विक्री करीत असून चांगला पैसा कमावत आहेत.