Online Subsidy : कांदा अनुदानाचा नवा जीआर आला, कुणाला मिळणार अनुदान ? वाचा सविस्तर

Online Subsidy : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या साडेतीनशे रुपये प्रति क्विंटलकांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील कांदा अनुदानाच्या (Online Subsidy) प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याचा अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार कुणाला आणि किती मिळणार अनुदान हे पाहुयात.

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2023 मध्ये मोठा सामना करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी पेक्षा कमी अशी वर्गवारी करून पहिला टप्पा दहा हजार रुपयांचा वाटप करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये 4000 रुपये असे आतापर्यंत 24 हजार रुपयापर्यंत अनुदान वितरित करण्यात आलं.

Online Subsidy

कांदा अनुदान चौथा हप्ता 20 हजार रुपये मिळणार ?

मागील वर्षी जाहीर झालेल्या कांदा अनुदानचा पहिल्या दुसऱ्या हप्त्यात 10 – 10 हजार व तिसऱ्या हप्त्यात 4 हजार रुपये प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना आता चौथ्या हप्त्यात 20 हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी एकुण 211 कोटी 66 लाख रुपये अनुदान महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

ज्यांची एकुण कांदा अनुदान रक्कम 44 हजाराच्या आत आहे, त्यांना मागील 24 हजार वगळून शिल्लक पुर्ण रक्कम मिळेल, त्यामुळे त्यांचे संपूर्ण अनुदान आता मिळून जाईल तर ज्यांची अनुदान रक्कम 44 हजारांपेक्षा जास्त आहे, त्यांना आता 20 हजार रुपये खात्यावर जमा होतील, असे जीआरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

1 thought on “Online Subsidy : कांदा अनुदानाचा नवा जीआर आला, कुणाला मिळणार अनुदान ? वाचा सविस्तर”

Leave a Comment

Close Visit News