Nuksan Bharpai : ‘सततचा पाऊस’ आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित.

Nuksan Bharpai : जून ते ऑक्टोबर 2022 या काळात सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित प्रस्तावांकरिता हा निकष लावला जाईल.
  • यापुढे घोषित झालेल्या ‘अतिवृष्टी’ या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष ठेवून सततच्या पावसाकरिता निश्चित केलेल्या दुसऱ्या ट्रीगरमधील सामान्यकृत वनस्पती निर्देशांक’ हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे.

Nuksan Bharpai

हे वाचा : पेट्रोल-डिझेल आणखी महाग ?

मदतीसाठी निकष कोणते ?
  • 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळामध्ये सलग 5 दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मि.मी पाऊस झाल्यास आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील 10 वर्षाच्या सरासरी पर्जन्यामानच्या तुलनेत 50 टक्के (दीडपट किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, सततच्या पावसाचा पहिला ट्रीगर लागू राहिल.
  • अशा महसूल मंडळामध्ये पहिला ट्रीगर लागू झाल्याच्या दिनांकापासून 15 व्या दिवसापर्यंत सामान्यकृत वनस्पती निर्देशांक तपासण्यात येतील. हे निकष तपासण्यासाठी 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचे सामान्यकृत वनस्पती निर्देशांक फरक जर 0.5 किंवा त्यापेक्षा कमी आल्यास, सततच्या पावसाचा (Nuksan Bharpai) दुसरा ट्रीगर लागू राहील.

1 thought on “Nuksan Bharpai : ‘सततचा पाऊस’ आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित.”

Leave a Comment