Namo Shetkari Yojana (लाभार्थी शेतकरी कोण ?)
- सामान्यता या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा (CM Kisam Yojana) लाभ दिला जाईल. अशी माहिती देण्यात आलेली आहे.
- परंतु अद्याप या संदर्भातील शासन निर्णय किंवा नियमावली प्रसिद्ध झालेली नाही, त्यामुळे नेमकी कोणती शेतकरी पात्र असतील याबद्दलची माहिती शासनाचा अधिकृत अपडेट आल्यानंतर समजेल.
1.15 कोटी शेतकऱ्यांना लाभ
- राज्यातील जवळपास 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यासाठी शासनाच्या तिजोरीवर जवळपास 6,900 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. आता केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणार.
Namo Shetkari Yojana
योजनेसाठी नोंदणी करावी लागेल का ?
- अद्याप या संदर्भातील कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही, परंतु PM किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाईल.
कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल ?
- जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पूर्वीपासूनच लाभ घेत असतील अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल.
2 thoughts on “Namo Shetkari Yojana Maharashtra”