Namo Shetkari Yojana Installment (पात्र लाभार्थिना मिळणार लाभ)
- शासनाने किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकयांची यादी आयकर विभागाकडे पाठविली होती. त्या लाभार्थीची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविली. आयकर दाते असलेले शेतकरी किसान सन्मान निधी मिळण्यास अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे या योजनेपासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थीना लाभ मिळू शकणार आहे.
Namo Shetkari Yojana Installment
केंद्राप्रमाणे राज्यही पैसे देणार
- केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधीतून शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये (चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांत दिले जातात. आता त्याच शेतकयांना राज्य सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देणार आहे. केंद्राच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष असणार आहेत. आयकरदाते, सरकारी नोकदार, लोकप्रतिनिधी या योजनेसाठी अपात्र आहेत. योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, आधार लिंक बँक खाते आणि संबंधित लाभार्थीच्या नावावरील सर्व मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता आता मेअखेरीस शेतकऱ्यांना मिळणार असून राज्य सरकार त्याचवेळी शेतकऱ्यांना पहिला हप्ता देणार आहे.