MSP : रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

MSP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२४-२५ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी (Rabi Crops) किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे. उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम २०२४-२५ साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे.

मसूरच्या एमएसपीमध्ये ४२५ रुपये प्रति क्विंटल तर पांढरी मोहरी आणि काळ्या मोहरी साठी २०० रुपये प्रति क्विंटल दराने वाढ मंजूर करण्यात आली आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी १५० रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी अनुक्रमे ११५ रुपये प्रति क्विंटल आणि १०५ रुपये प्रति क्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे.

MSP

पिकेएमएसपी २०२३-२४एमएसपी २०२४-२५वाढीव एमएसपी फरक 
गहू२१२५२२७५१५०
हरभरा५३३५५४४०१०५
मसूर६०००६४२५४२५
मोहरी५४५०५६५०२००
करडई५६५०५८००१५०

विपणन हंगाम २०२४-२५ साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी (Rabi Crops MSP) एमएसपी मधील वाढ देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट इतकी निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ च्या घोषणेनुसार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या सरासरी उत्पादन खर्चावर अपेक्षित सर्वात जास्त १०२% भाव गव्हासाठी मिळणार असून त्या खालोखाल पांढरी-काळी मोहरी या पिकांसाठी ९८%, मसुरला ८९%, हरभऱ्याला ६०%, बार्लीला ६०% तर करडईला ५२% अधिक भाव मिळणार आहे. रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.

Leave a comment