Milk Subsidy : दूध अनुदानासाठी आला नाव नियम, दिवसाऐवजी 10 दिवसाला माहिती भरता येणार

Milk Subsidy : राज्य शासनाकडून गायदूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी प्राथमिक दूध संस्थांना दिवसाला द्यावी लागणारी माहिती आता दहा दिवसांतून एकदा देण्यास सवलत दिली आहे. त्याचबरोबर इंग्रजी ऐवजी मराठीत माहिती द्यावी, असा निर्णय मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला.

राज्यात गाय दुधाच्या दरात (Cow Milk Rates मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. दूध पावडर आणि बटरच्या दरात घसरण झाल्याने या दूध संघांनी दर कमी केले आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्हा वगळता राज्यातील दूध संघांकडून २५ रुपये लिटरने गाय दूध खरेदी (milk rate) केली जाते. त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यासाठी, राज्य शासनाने गाय दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

Milk Subsidy

मात्र, हे अनुदान मिळण्यासाठी शासनाने अनेक अटी घातल्या आहेत. यामध्ये दूध उत्पादकाचा व्यवहार हा कॅशलेस असावा, त्याच्या गोठ्यातील पशुधन भारत पशुधन अँप्स अंतर्गत नोंदणी झालेले असावे. त्याचे बँक खाते आधारशी लिंक असावे त्याचबरोबर प्राथमिक दूध संस्थांनी संकलनाची माहिती रोज इंग्रजीमध्ये भरून दूध संघाला पाठवणे बंधनकारक केले होते.

अनुदानाला तीन महिने मुदतवाढ शक्यशासनाने ११ जानेवारी ते १० फेब्रुवारीसाठी अनुदान देण्याचे ठरवले आहे. पण, सध्या गाय दूध पावडर दरात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे किमान आणखी तीन महिने अनुदानाला मुदतवाढ देण्याची मागणी केली. याबाबत, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होऊ शकतो.

2 thoughts on “Milk Subsidy : दूध अनुदानासाठी आला नाव नियम, दिवसाऐवजी 10 दिवसाला माहिती भरता येणार”

Leave a Comment

Close Visit News