प्रशिक्षणासाठी टॅबही मोफत (Mahajyoti Free Tablet Yojana)
- या प्रशिक्षणाचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या शिक्षणाच्या अभ्यासासाठी मोफत टॅबही देण्यात येणार आहेत. केवळ टॅबच नाही तर विद्यार्थ्यांना दिवसाला सहा जीबी इंटरनेटही पुरविण्याची ही योजना आहे.
Mahajyoti Free Tablet Yojana
घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज
- या प्रशिक्षण वर्गासाठी घरबसल्या महाज्योती संस्थेच्या https://mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळावरून हा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येतो, मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधीच आपल्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.
31 मार्चपर्यंतची मुदत
- महाज्योतीकडून नीट, सीईटी परीक्षेचे प्रशिक्षणासाठी मोफत टॅब देण्याच्या या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.