Free Tablet : वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती- जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून महाराष्ट्र शासन नीट, सीईटी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना मोफत टॅबसोबत इंटरनेट सुविधाही पुरविण्यात येणार आहे.
महाज्योती योजना
- सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत आहे.
- विद्याथ्र्यांना महाज्योतीकडून नीट, सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण तसेच अभ्यासासाठी मोफत टॅबही देण्यात येणार आहे. केवळ टॅबच नाही तर दिवसाला सहा जीबी इंटरनेटही पुरविण्याची ही योजना आहे.
Free Tablet Yojana
कोणते विद्यार्थी पात्र ?
- इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थी सध्या दहावीची परीक्षा देत आहेत, त्याच विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
कागदपत्रे काय लागतात ?
- गुणपत्रक,
- दहावी परीक्षेचे हॉलतिकीट,
- रहिवासी दाखला,
- आधार कार्ड,
- जातीचे प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- याशिवाय दहावी परीक्षेचा निकाल लागल्यावर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, नीट किंवा सीईटी परीक्षेची तयारी करत असल्याचे हमीपत्रही विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.
Excellent blog post. I definitely appreciate this website. Continue the good work!