Magel tyala saur krushi pump मागील त्याला सौर कृषी पंप.

Magel tyala saur krushi pump  नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर पंप अर्ज राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याकरिता नवीन पोर्टल तयार करण्यात आले होते या पोर्टलवर अर्ज करण्यास सुरू झाले नव्हते परंतु आता या पोर्टलवर नव्याने शेतकऱ्यांचे अर्ज सुरू झालेले आहेत हे नवीन अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती पाहूया

 

अर्ज करण्याकरिता आवश्यक असणारे कागदपत्रे

१)शेतकऱ्याचे आधार कार्ड

२) बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँकेचे

३)पासपोर्ट आकाराचा फोटो
४)सातबारा ( विहीर बोरवेल याची नोंद सातबारावर असणे आवश्यक आहे) एकापेक्षा जास्त भोगवटा दार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या बॉण्डवर देणे आवश्यक.
मागेल त्याला सौर पंप अर्ज कसा करावा
IMG 20240920 WA0004

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY या संकेतस्थळावर जावे लागेल या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर लाभार्थी सुविधा हा टॅब दिसेल या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज करा या पर्यायावर ती क्लिक करावे लागेल.

 

मागेल त्याला सौर पंप अर्ज करा वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल या टॅब मध्ये जर आपण महावितरण कडे शेती वीजपुरवठा करिता अर्ज केला असेल तर आपल्याला त्याची माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे. लक्षात असू द्या या ठिकाणी माहिती देताना जर आपले कनेक्शन प्रलंबित असेल तरच आपण माहिती देऊ शकता व याचा लाभ घेऊ शकता.Magel tyala saur krushi pump

  • अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील
    अर्जदाराचा आधार क्रमांक
    योजनेचे नाव ऑटोमॅटिक येते
    जिल्हा निवडा
    तालुका निवडा
    गावाचे नाव निवडा
    गट क्रमांक टाका
    उपगट क्रमांक निवडा
    शेतीचा प्रकार निवडा (स्वतः मालकीची की संयुक्त खाते)
    जमीन मालकाचे नाव निवडा
    जमिनीचे एकूण क्षेत्रफळ ऑटोमॅटिक येते
    अर्जदार नाव
    अर्जदाराच्या वडिलांचे नाव
    अर्जदाराचे आडनाव
    ही माहिती भरून घ्या त्यानंतर लिंग निवडा, प्रवर्ग निवडा, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी भरून घ्या.

 

सोलार पंप योजनेतून अतिरिक्त कोटा मंजूर

अर्जदार रहिवाशी पत्ता व ठिकाण
घर क्रमांक
रस्ता खून
जिल्हा निवडा
तालुका निवडा
गावाचे नाव निवडा
पिन कोड सिलेक्ट करा
मोबाईल क्रमांक भरा
पॅन नंबर उपलब्ध असेल तर पॅन नंबर देखील भरा.
जल स्त्रोत आणि सिंचन माहिती
जलस्त्रोतांचा प्रकार निवडा ज्यामध्ये विहीर बोरवेल काय असेल ते निवडून घ्या.
सिंचनाचा प्रकार निवडून घ्या .
पाण्याची गुणवत्ता प्रकार.
जलस्रोताची खोली फुटामध्ये भरा.
पावसाळी हंगामात जलस्रोताची खोली किती असते ते फुटामध्ये भरा.
उन्हाळी हंगामातील पाण्याची खोली किती असते ते फुटामध्ये भरा.
विद्यमान शेत तलाव आहे का होय किंवा नाही निवडा.
बोरवेलची रुंदी इंच मध्ये असेल तर भरा नसेल तर राहू द्या.
कृषी तपशील पीक माहिती
पिकांचे प्रकार
मागील वर्ष यामध्ये खरीप किंवा रब्बी निवडा
पिकांची मागील संख्या एक-दोन काय असेल ते निवडा
पिकांचा प्रकार शेवटच वर्ष खरीप किंवा रब्बी निवडा
शेवटच्या वर्षीची पिक संख्या.
विद्यमानपंप तपशील
विद्यमान पंप वापरत असाल तर होय करा वापरत नसाल तर नाही करा.Magel tyala saur krushi pump

 

जर वापरत असाल तर विद्यमान पंपाचा प्रकार, विद्यमान पंपाचा उपप्रकार, एचपी किती एचपी चे पंप वापरतात, ऊर्जा स्त्रोत कोणता आहे, कोणत्या उर्जेवर वापरतात, ऊर्जा कार्यक्षम पंप आणि लिटर मध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता माहिती भरा.

 

आवश्यक पंपाचे तपशील

  • आवश्यक पंपाचा प्रकार
    पंप उपप्रकार
    आवश्यक पंप श्रेणी एचपी मध्ये
    पंप क्षमता आवश्यक पाणी उपसा प्रति लिटर प्रति मिनिट या ठिकाणी भरा.
    मागेल त्याला सौर पंप अर्ज बँक तपशील
    बँक खाते नंबर
    खातेधारकाचे नाव
    आयएफसी कोड
    बँकेचे नाव
    एम आर सी आर कोड
    शाखेचे नाव शाखेचे शहर
    घोषणापत्र
  • मागेल त्याला सौर पंप अर्ज यामध्ये खाली दिलेल्या तिन्ही बाणावरती राईट करून घ्यावे लागेल. ज्यामध्ये वरील माहिती मला समजली असून समजावून देण्यात आले असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे. त्याखाली मी भरलेल्या फॉर्म तपासला आहे सबमिट केली सर्व माहिती बरोबर आहे. मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलताना परवानगी दिली जाणार नाही या अटींना राईट करून घ्या.

 

कागदपत्रे अपलोड
१)सातबारा
२)आधार कार्ड
३)बँक पासबुक
४)पासपोर्ट आकाराचा फोटो
डॉक्युमेंट निवडल्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंट च्या पुढे आपलोड या पर्यावरण क्लिक करावे लागेल. त्यानंतर जर आपले इतर काही कागदपत्रे उपलब्ध असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील. त्यामध्ये पाणी प्रवाहित क्षेत्र शेतजमीन सामायिक क्षेत्र असल्यास ना हरकत प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमातीचे जात प्रमाणपत्र हे कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करून घ्यावे लागतील.Magel tyala saur krushi pump

 

सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर वरील भरलेली सर्व माहिती एकदा तपासून पहा, माहिती बरोबर असल्यास शेवटी अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी त्या ठिकाणी व्यवस्थित भरून अर्ज सबमिट करा. या पर्याय क्लिक करा. आपला अर्ज यशस्वीरित्या सादर झाला आहे अशा पद्धतीचा एसएमएस आपल्या मोबाईल नंबर वर पाठवण्यात येईल.

Leave a Comment