LPG Gas Price : घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले, सरकारचा निर्णय..

LPG Gas Price : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब, होतकरु आणि सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या दरात (LPG cylinder price) पुन्हा एकदा मोठी घसरण केली आहे. यावेळी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे.

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या (Gas Subsidy) सबसिडीत पुन्हा वाढ केलीय. याआधी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. आता आणखी 100 रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त 600 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. 

LPG Gas Price

आता 300 रुपये सबसिडी

उज्ज्वला योजनेतील (PMUY Scheme) ग्राहकांसाठी 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरचे दर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त केले होते. त्यानंतर आता याचबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतलाय.

1 thought on “LPG Gas Price : घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले, सरकारचा निर्णय..”

Leave a comment