Ladka Bhau Yojana : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेच्या (Ladli Behna Yojana) धर्तीवर आता राज्यामध्ये मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमधून मोफत प्रशिक्षण (Free training) मिळवून देणार आहे. हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी दिले जाणार आहे.
लाभार्थी तरुणांच्या बँक खात्यांमध्ये सरकार विद्या वेतन (Stipend) म्हणून प्रति महिना 6 ते 10 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार आहे. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा भरावा ? आवश्यक कागदपत्रे कोणती ? पात्रात काय ? याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Majha Ladka Bhau Yojana
12 उत्तीर्ण अर्जदाराला दर महिन्याला 6 हजार रुपये मिळणार आहेत. आय.टी.आय किंवा डिप्लोमा केलेल्या अर्जदाराला दर महिन्याला 8 हजार रुपये मिळणार आहेत. पदवीधर अर्जदाराला दर महिन्याला 10 हजार रुपये मिळणार आहेत. सरकार अर्जदार तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे जमा होणार आहेत.
Eligibility For Ladka Bhau Yojana
योजनेसाठी नेमके पात्रात कोण आहेत ?
- अर्जदार तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- लाभार्थी तरुणाचं वय हे 18 ते 35 वयोगटाच्या आत असावं.
- अर्जदाराचे शिक्षण हे 12 वी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असावं.
- अर्जदार तरुण हा बेरोजगार असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल.
- बँक खातं आधारकार्डशी जोडलं असावं.
Ladka Bhau Yojana Documents
लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधारकार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- जन्मदाखला किंवा वयाचा दाखला
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते पासबुक
Ladka Bhau Yojana Online Apply
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
- या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भराव लागणार आहे.
- यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावं – https://rojgar.mahaswayam.gov.in.
- होम पेज वर New User Registration या बटनावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर लगेच पुढे तुमच्या समोर ऑनलाईन अर्ज ओपन होईल.
- अर्जमध्ये विचारलेली सर्व माहिती काळजी पूर्वकपणे भर.
- यानंतर मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमीट बटनवर क्लिक करा.
- अर्ज सबमीट झाल्यानंतर तुम्हाला पावती मिळेल.
ऑफलाईन अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुद्धा करु शकता. यासाठी माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून. त्या अर्जाची प्रिंट काढा यानंतर त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावा.
Benefits of Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
- राज्यातील बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगार निर्माण करणे.
- बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासोबतच दरमहा १० हजार रुपयांच्या आर्थिक मदत.
- राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढविणे.
- लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षण.
- राज्य सरकार यासाठी 6,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.