Kadba Kutti Machine Subsidy : कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज करा ?

Kadba Kutti Machine Subsidy (कागदपत्र )

  • शेतकऱ्यांचा आधारकार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • 8अ उतारा
  • GST बिल, कोटेशन, हमीपत्र, करारनामा (लॉटरी लागल्यानंतर)

Kadba Kutti Machine Subsidy

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
  • महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर तीन उपघटक दिसतील, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, फलोत्पादन. यापैकी कृषी यांत्रिकीकरण या समोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.
  • आता योजना निवडण्यासाठी मुख्य प्रक्रिया सुरू होईल या ठिकाणी अशाप्रकारे पर्याय निवडा. कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य > मनुष्य चलित अवजारे > फॉरेज ग्रॉस अँड स्ट्रॉ / रेसिडू मॅनेजमेंट (कटर/श्रेडर) > चाफ कटर
  • वरीलप्रमाणे पर्याय निवडल्यानंतर जतन करा या बटणावर क्लिक करा.
  • जर तुम्ही नवीन शेतकरी असाल व नोंदणी करून सर्वप्रथम कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज करत असाल तर तुम्हाला २३.६० पैसे इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
  • जर तुम्ही यापूर्वी कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज केलेला असेल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.

1 thought on “Kadba Kutti Machine Subsidy : कडबा कुट्टी मशीनसाठी अर्ज करा ?”

Leave a Comment