Horticulture loan subsidy (फळ पिकांसाठी कर्ज ?)
- भाजीपाला, फळ व फूल पिकांसाठी कर्जाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यात केळी व कापूस या दोनच पिकांसाठी शेतकऱ्यांकडून कर्ज घेतले जाते. भाजीपाला व फळ पिकांसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे.
गतवर्षी दीड लाख शेतकऱ्यांना 800 कोटींचे पीककर्जवाटप
- जिल्हा बँकेने गेल्यावर्षी दीड लाख शेतकऱ्यांना 800 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्ज वाटपाचा इष्टांक ठरवून दिलेला असतो, प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त कर्ज वाटप होते.
Horticulture Loan Subsidy
काय आहे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकयांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदतीत पीककर्ज परतफेड करणाया शेतकऱ्यांना 1 लाख रुपये कर्ज मर्यादिपर्यंत 3 टक्के व्याज सवलत,
- 11 लाख ते 3 लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्का व्याजदरात सवलत देण्यात येत होती. आता 1 लाख ते 3 लाख रुपये या कर्जमर्यादेमध्ये शेतकयांनी अल्पमुदत पीककर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक 2 टक्के व्याजदरात सवलत देण्यात येते.