Health insurance : आरोग्य विम्यात व्यापक बदल, ‘हे’ हाेतील फायदे

Health insurance : नवे वर्ष 2024 हे अनेक नव्या बदलांसह सुरू झाले आहे. यातील बदल जाणून घेणे आवश्यक आहेत. यात आरोग्य विम्यातील Health insurance बदलाचा समावेश आहे. ‘सीआयएस’मध्ये कस्टमर इन्फॉर्मेशन शीट हे एक नवीन डॉक्युमेंट असून ते 1 जानेवारीपासून लागू झाले आहे. यानुसार पॉलिसीधारकाला त्याचा थेट फायदा मिळेल. सीआयएस ही पॉलिसीधारकाला हेल्थ पॉलिसी समजण्यास मदत करेल.

प्रत्येक पॉलिसीधारकाला पॉलिसी खरेदी करताना ‘सीआयएस’ उपलब्ध करुन दिले जाईल. यात पॉलिसीधारकाला Health insurance आवश्यक माहितीचा गोषवारा असेल. एकुणातच या डॉक्यूमेंटमुळे सोप्या भाषेत विमा पॉलिसी समजण्यास हातभार लागेल. इर्डा म्हणजेच ‘इन्शूरन्स रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडिया’ च्या गाईडलाइन्सनुसार सीआयएस असेल. कस्टमर इन्फॉरमेशन शीटमुळे विमा योजना अधिक पारदर्शी आणि यूजर फे्रंडली होतील.

Health insurance

आणखी कोणती खास सुविधा ?

‘इर्डा’च्या नियमानुसार पॉलिसी खरेदी करताना पंधरा दिवसांचा फ्री लूक पीरियड दिला जाईल. यानुसार पॉलिसीधारकाला पंधरा दिवसांपर्यंत पॉलिसीची इत्यंभूत माहिती घेता येईल अणि त्यानुसार पॉलिसी सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेऊ शकतो. ‘सीआयएस’ची सोपी भाषा आणि पंधरा दिवसांचा कालावधी या दोन्ही बाबींमुळे पॉलिसीधारकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली गेली आहे.

पॉलिसीचे आकलन केल्यानंतर आणि समाधान झाल्यानंतरच संबंधित पॉलिसी सुरू ठेवायची नाही, याबाबत ग्राहक निर्णय घेऊ शकतात. याप्रमाणे चुकीची पॉलिसी माथी मारणे किंवा पॉलिसी खरेदीस भाग पाडणे, यांसारख्या अनुभवातून ग्राहकांची सुटका होईल आणि खरेदीत पारदर्शकता राहील.

1 thought on “Health insurance : आरोग्य विम्यात व्यापक बदल, ‘हे’ हाेतील फायदे”

Leave a Comment

Close Visit News