Harbhara Rate : रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव.!

Harbhara Rate : यंदाच्या खरीप हंगामात निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे लक्ष आता रब्बी हंगामाकडे लागून आहे. रब्बी हंगामात यंदाही गहू, हरभऱ्यालाच सर्वाधिक पसंती राहणार असून, कृषी विभागाने नियोजन केले आहे. यंदा मान्सूनचे विलंबाने आगमन झाल्याने खरीप हंगामात पेरण्याही उशिराने झाल्या होत्या. त्यानंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच पिवळा मोझॅक व अन्य रोगराईमुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामाने निराशा केल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त रब्बी हंगामातील पिकांवर आहे.

यंदा 1 लाख 15 हजार 770 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक 75 हजार हेक्टरच्या आसपास हरभरा पेरणीचा अंदाज वर्तविला आहे . सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी गव्हाच्या पेरणीला प्राधान्य देतात. 35 हजार हेक्टरच्या आसपास गव्हाची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरडवाहू पीक म्हणून ओळख असलेल्या करडईकडेही काही शेतकरी वळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Harbhara Rate

याशिवाय मसूर, राजमा, सूर्यफूल, मोहरी या पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. मात्र, या पिकांखालील क्षेत्रफळ अत्यल्प राहिल, असे सांगण्यात येते.असे आहे रब्बी पीक पेरणीचे नियोजन (हेक्टर)पीक / नियोजन

गहू 35000
हरभरा 75000
ज्वारी 1800
करडई 1500
इतर तृणधान्य 500
Crop Loan Maharashtra
Crop Loan Maharashtra

2 thoughts on “Harbhara Rate : रब्बीत गहू, हरभरा खाणार भाव.!”

Leave a comment