Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात होत असणारी घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. आज सोन्याच्या दरातही चढ-उतार नोंदवली गेली आहे. तर, चांदीच्या दरात आज थोड्या फार फरकाने वाढ झाली आहे.
सराफा बाजारात होणाऱ्या उलाढालीवर एकदा नजर टाकल्यास सोनं आणि चांदी दोन्हींमध्ये घसरण झाल्याची नोंद आहे. चांदीच्या दरात तर मोठी घट झाली आहे. आज सकाळी सोन्याच्या दरात कोणतीही मोठी वाढ झालेली नाहीये. आज मौल्यवान धातू 71,465 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे. तर, चांदी 122 रुपयांच्या तेजीने 83,687 रुपयांवर व्यवहार करत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातुच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने तिसऱ्या सत्रात सोन्याच्या दरात घट झाली आहे. अखिल भारतीय सराफा संघानुसार, 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर, 73,250 रुपये प्रति तोळा इतकी आज सोन्याची किंमत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत तसेच जागतिक प्रभावामुळे ज्वेलर्स आणि किरकोळ खरेदीदारांच्या मागणीमुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत.
मुंबईत सोन्याच्या किंमती
22 कॅरेट सोन्याची किंमत- 66,680
24 कॅरेट सोन्याची किंमत- 72,750