Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत 81 कोटी 24 लाख 28 हजार 34 रुपयांचा परतावा जाहीर झाला असून, 24 हजार 613 शेतकरी विमा (Insurance Coverage) परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या हंगामात आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष खात्यात रक्कम कधी जमा होणार याबाबत बागायतदारांना प्रतीक्षा आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (Fruit Crop Insurance) केंद्र शासनाने जाहीर केली. जिल्ह्यातील 26 हजार 282 आंबा व 5835 काजू उत्पादक मिळून एकूण 32 हजार 117 बागायतदार शेतकऱ्यांनी एकूण 17 हजार 622.43 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. काजू उत्पादक 4 हजार 52 बागायतदारांना सात कोटी 44 लाख 75 हजार 954 तर आंबा उत्पादक 24 हजार 613 बागायतदारांना 73 कोटी 97 लाख 52 हजार 80 रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे.
Fruit Crop Insurance
हवामानातील बदलामुळे एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प होते. उत्पादनासाठी केलेला खर्चही बागायतदारांचा न निघाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बागायतदारांना विमा परतावा (Crop Insurance) रकमेची अपेक्षा होती. दरवर्षी ऑगस्टमध्ये विमा परतावा जाहीर होतो. यावर्षी परतावा जाहीर करण्यास विलंब झाला आहे. शिवाय शासनाकडून हप्त्याचे पैसे न जमा झाल्याने बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

1 thought on “Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेंतर्गत 81 कोटींचा विमा मंजूर”