Financial New Year 2023 : आजपासून होणार महत्त्वाचे 11 बदल.

Financial New Year 2023

  • सोने महागणार : सोने व इमिटेशन ज्वेलरीवरील आयात कर 20 टक्क्यांवरून 25% तर चांदीवरील आयात कर 1.5 टक्क्यांवरून 16 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे सोन्यासह सर्व दागिने महागतील.
  • ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक : सोन्याच्या दागिन्यांवर ६ अंकी हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना दागिने विकता येणार नाहीत.
  • पंतप्रधान वय वंदना योजना बंद : पंतप्रधान वय वंदना योजना बंद होईल. 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी ही एकरकमी हप्त्याची पेन्शन योजना होती.

Financial New Year 2023

  • विना पॅन पीएफ काढण्यावरील करात कपात : पॅन क्रमांक जोडलेला नसलेल्या खात्यातून पीएफ काढल्यास 30% टीडीएस कापला जात होता. 1 एप्रिलपासून 20%च कापला जाईल.
  • ज्येष्ठ नागरिक बचत : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. आधी ही मर्यादा 15 लाख रुपये होती. या योजनेत वार्षिक 8% व्याज मिळते.
  • महिला सन्मान योजना : “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 1 एप्रिलपासून सुरु होईल. यात महिला 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवू शकतील. त्यावर 7.5 टक्के व्याज मिळेल.
  • डेट फंडावरील एलटीसीजी सवलत बंद : डेट म्युच्युअल फंडावरील दीर्घकालीन लाभ करातील (एलटीसीजी) सवलत बंद होईल. त्यामुळे त्यावर टॅक्स स्लॅबच्या हिशेबाने कर लागेल.

Leave a Comment