Favarni Pump Lottery : महा डिबीटी (MAHADBT) वर शंभर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना फवारणी पंप (Sprayer Pump) देण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप (Sprayer Pump Subsidy) दिले जात आहे. 100% फवारणी पंप अनुदानामध्ये लाखो शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहे. काल दिनांक. 09/सप्टेंबर रोजी बॅटरी पंपाची लॉटरी लागली आहे.
राज्यातील कापूस, सोयाबीन आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ होण्यासाठी फवारणी पंप 100% अनुदानावर दिले जात आहे. फवारणी पंपांच्या वितरण संख्येच्या तुलनेत चार ते पाच पटीने अर्ज सादर असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार नाहीत. विशेष म्हणजे लॉटरी पद्धतीने या फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे. जे शेतकरी या फवारणी पंपामध्ये पात्र असतील त्या शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे.
Favarni Pump Lottery
09 सप्टेंबर रोजी फवारणी पंपाची लॉटरी लागली असून, फवारणी पंपासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार ही आशा तर माळवली आहे. फवारणी पंपाचे वितरण लॉटरी पद्धतीने होणार असून, त्यामध्ये जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप दिले जाणार आहे.
फवारणी पंपासाठी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे म्हणजेच पात्र झाल्याचा मेसेज आला आहे. त्या शेतकऱ्यांनी पुढे काय करावे याची माहिती कृषी विभागाकडून दिली जाईल.