Farming Business : शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय ? 40 टक्के अनुदानावर

Farming Business : राष्ट्रीय पशुधन अभियानात आता 40 टक्के अनुदानावर शेळी, कुक्कुट व वराहपालन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चारानिर्मितीसाठीही तेवढेच अनुदान दिले जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास 2026 पर्यंत लाभार्थीना या योजनेत लाभ दिला जाणार आहे. शासनाने पशुधन विकासासाठी हाती घेतलेल्या राष्ट्रीय पशुधन अभियानात नवउद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.

या पार्श्वभूमीवर व्यवसाय म्हणून शेतीला जोडधंदा (Side Business) करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.यात दोन हेक्टरच्या मर्यादेत शेती असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या प्रत्येक योजनेत 50 टक्के अनुदान व 10 टक्के स्वहिस्सा लागणार आहे.

Farming Business

कुक्कुटपालनाचा 50 लाखांपर्यंत प्रकल्प

  • एक हजार मांसल पक्षी, दोन शेड, अंडी उबवण यंत्र, असा ५० लाखांपर्यंतचा प्रकल्प उभारण्याची संधी आहे. यातही 50 टक्के अनुदान व 10 टक्के स्वहिस्सा लागेल.

शेळी गटासाठी 1 कोटीपर्यंतची योजना

  • 100 शेळ्या व पाच बोकड, असा गट तयार करण्यासाठी 20 लाखांपर्यंतचा प्रकल्प उभारता येणार आहे. स्वहिस्सा व अनुदान वगळता इतर रकमेचा कर्ज प्रस्ताव करावा लागणार आहे.
  • 200 शेळ्या, 10 बोकडसाठी 40 लाखांचा प्रकल्प असेल. या पटीत एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाला शासन अनुदान देणार आहे.
ऑनलाइन अर्ज करा
  • या योजनेच्या लाभासाठी www.udyamimitra.gov.in या पोर्टलवर थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जर शेतकऱ्यांना यात अडचण येत असल्यास त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधून पशुसं वर्धन विभागाची मदत घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी यांनी केले आहे.

1 thought on “Farming Business : शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय ? 40 टक्के अनुदानावर”

Leave a comment