Dr BAKSY डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अर्ज करा no

Dr. BAKSY : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ या नावाने राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक ते समाजातील वंचित घटकांना मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असते. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना या तळागाळातील घटकांना लाभदायी ठरत आहेत. नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्याबरोबरच राज्याचा आर्थिक कणा असलेला बळीराजा अधिक सक्षम होण्यासाठी राज्यशासन विविध योजना राबवत असते.

मुंबई वगळता इतर सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ७ बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे. पात्र शेतकऱ्यांस नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यापैकी कोणत्याही एका बाबीचा लाभ घेता येईल व त्यासोबत मागणीनुसार वीज जोडणी आकार, पंपसंच, इनवेल बोअरिंग, सूक्ष्म सिंचन संच , ठिबक संच पैकी एका बाबीचा लाभ घेता येईल.

Dr BAKSY Yojana

अर्ज कुठे करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी www.krishi.maharashtra.gov.in किंवा या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतीसह प्रस्ताव गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करुन अर्जाची मूळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह कृषी अधिकारी यांच्याकडे स्वहस्ते जमा करावी.

तसेच यापूर्वी पंचायत समिती कार्यालयास अर्ज सादर केला असल्यास शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधावा.

1 thought on “Dr BAKSY डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अर्ज करा no”

Leave a comment