Crop Loan Maharashtra Documents

Crop Loan Maharashtra Documents (पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्र)

पीक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र सामान्यता कर्ज मर्यादेनुसार कमी जास्त होत असतात. एक पॉईंट सात लाखापासून तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळी कागदपत्र जमा करून संबंधित बँकेमध्ये अर्ज करावा लागतो.

1.60 लाखापर्यंत
  • आधारकार्ड
  • 7/12 उतारा
  • 8 अ उतारा
  • जमिनीचा नकाशा
  • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • स्टॅम्प (कर्ज मर्यादानुसार 100 रु. 3 किंवा 4 स्टॅम्प)
  • इतर बँकेकडून कर्ज न घेतल्याचा दाखला.
1.60 लाखापेक्षा जास्त

1.60 लाखापेक्षा जास्त पीक कर्ज घेत असल्यास शेतकऱ्यांना वरील नमूद कागदपत्रा व्यतिरिक्त खालील कागदपत्र अर्ज करतेवेळी जोडून संबंधित बँकेत द्यावी लागतील.

  • नकाशा व जमिनीची चतुरसीमा
  • फेरफार नक्कल
  • बे-बाकी दाखला
  • ओलिताचं प्रमाणपत्र
  • कृषी उत्पन्नाचा दाखला
  • इतर बँकेचे कर्ज नसल्याबाबत दाखला.

Crop Loan Maharashtra Documents

पीक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?

संबंधित शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी पीककर्ज मिळवताना आपल्या गावातील दत्तक बँक किंवा तालुक्याला असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पीक कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म म्हणजेच अर्ज भरावा लागेल. विहित नमुन्यातील अर्ज काळजीपूर्वक भरून आवश्यक ती सर्व कागदपत्र संबंधित बँकेमध्ये जमा करावी लागतील.

जमा करण्यात आलेल्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी बँक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल, जर शेतकरी पात्र असतील व सर्व कागदपत्रे योग्य असतील, तर साधारणतः 7 ते 8 दिवसांमध्ये पीककर्ज मंजूर केलं जातं व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरित केली जाते.