Cotton Rate : ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कापसाचे भाव कसे राहतील

Cotton Rate : कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे जे व्हाइट गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन (Cotton Production) करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी 25% वाट भारताचा आहे आहे. राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत मागील वर्षाच्या तुलनेत 2022-23 मध्ये आयातीत 55% वाढ आणि निर्यातीत 23% घट होण्याचा अंदाज आहे.

दिनांक 12 ऑक्टोबर २३ रोजी आर्वी बाजारसमितीत (Cotton Market) कापसाची 105 क्विंटल आवक झाली. कमीत कमी भाव 7300, जास्तीत जास्त 7350, तर सरासरी 7320 रुपये प्रति क्विंटल असे राहिले. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी खामगाव बाजारसमितीत (Cotton Market) मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी 6900 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.

Cotton Rate Today

गेल्या चार महिन्यांपासून अकोला बाजारपेठेत (Cotton Market) कापसाचे भाव थोडे कमी होत आहेत. मागील तीन वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कापसाच्या किमती पुढील प्रमाणे आहेत:

  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 रु 5250 प्रति क्विंटल
  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 रु 79239 प्रति क्विंटल
  • ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 रु. 8762 प्रति क्विंटल

ऑक्टोबर ते डिसेंबर अंदाज

  • दरम्यान ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीसाठी कापसाच्या किमती (Cotton Rate) अंदाजे रु. 7500 ते 8500 प्रति क्विंटल राहतील असा अंदाज स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार जोखीम विभागाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
कापसाचे बाजारभाव असे होते
बाजार समितीआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
आर्वी105730073507320
खामगाव21660072006900
सिरोंचा70650067006600
यावल109645074106910
पुलगाव93680073007100
खामगाव33660072006900

1 thought on “Cotton Rate : ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कापसाचे भाव कसे राहतील”

Leave a comment