Cheap Loans : घर, वाहन किंवा महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जण कर्ज घेतात. कर्ज मिळणे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ज्यांचे निश्चित उत्पन्न असते त्यांना सहसा अडचण जात नाही. मात्र, याशिवाय एक घटक असा आहे. जो तुम्हाला कर्ज मिळते किंवा व्याजदरावर परिणाम करतो, तो म्हणजे सिबिल स्कोर (Cibil Score) अर्थात तुमचे मत मानांकन. हा स्कोर खराब असेल तर बँका कर्ज नाकारतात. तर खूप चांगला असल्यास व्याजदरही कमी करतात. सिबिल स्कोर कमी असेल तर जास्त व्याजदर आकारला जातो.
सिबिल स्कोर आणि व्याजदर सिबिल स्कोर हा 300 ते 900 या दरम्यान असतो. 750 पेक्षा अधिक स्कोर असल्यास बँका सहज कर्ज देतात. तसेच व्याजदरही कमी ठेवतात. सिबिल कमी असल्यास बँका सहज कर्ज देत नाही. दिल्यास साधारणत: 2 टक्के जास्त व्याजदर आकारतात. मात्र, व्याजदर रेपो रेटपेक्षा 2.5 टक्क्यांनी अधिक नको.
Cheap Loans
असा करा सिबिल स्कोर मजबूत
म्हणून सिबिल स्कोर हवा चांगला
- सिबिल चांगला ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. बँका किवा वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी सिबिल स्कोर जाणून घेतात. त्या आधारे कर्ज देण्याबाबत अर्जदाराची पात्रता ठरविण्यात येते.
- एखाद्या व्यक्त्तिची आर्थिक स्थिती कशी आहे, याची माहिती सिबिल स्कोरद्वारे कळते. कर्जाची परतफेड करण्यास संबंधित व्यक्त्ति सक्षम आहे का, याची पडताळणी त्यातून होते.
Excellent blog post. I definitely appreciate this website. Continue the good work!