BSNL TATA Deal : टाटा आणि BSNLमध्ये करार मिळणार स्वस्तात इंटरनेट

BSNL TATA Deal : अलीकडे जिओ आणि एअरटेलने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत आहे. Jio आणि Airtel चे रिचार्ज महाग झाल्यामुळे BSNL ने TATA सोबत हातमिळवणी केली आहे.

TATA आता BSNL ची कमान हाती घेण्याची तयारी करत आहे. असे मानले जात आहे की TCS आणि BSNL यांच्यात 15,000 कोटी रुपयांचा करार झाला आहे, ज्यामुळे भारतातील 4G नेटवर्क आणखी वेगाने विकसीत होईल. याशिवाय 5G नेटवर्कची पायाभरणी करण्याचे कामही केले जाणार आहे.

BSNL TATA Deal

एवढेच नाही तर TCS आणि BSNL मिळून भारतातील सुमारे 1000 गावांमध्ये 4G इंटरनेट सेवा पुरवणार आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतातील युजरला आता वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. सध्या 4G इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत, TATA स्पर्धेत आल्यानंतर, BSNL भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करेल आणि Jio, Airtel ला देखील टक्कर देईल.

TCS च्या वतीने, भारतात डेटा सेंटर तयार केले जात आहे. टाटा चार क्षेत्रांमध्ये डेटा सेंटर उभारण्याचे काम करत आहे. ही डेटा केंद्रे भारतातील 4G पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करणार आहेत. त्याच वेळी, BSNL द्वारे देशभरात 9000 हून अधिक 4G नेटवर्क उभारण्याचे काम केले जात आहे.

Leave a Comment