Bhausaheb Phundkar Phalbag Lagawad (योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करता येवू शकतो. तसेच या योजनेच्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.
Bhausaheb Phundkar Phalbag Lagawad
योजनेसाठी पात्रता व कागदपत्रे
- फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्याला ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
- सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- वैयक्तिक शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. संस्थात्मक लाभार्थांना या योजनेचा लाभ देय नाही.
- शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर 7/12 असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
- 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
- परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
- इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.